प्रतिनिधि:प्रमोद झिले हिंगणघाट
येरला:- हिंगणघाट येथील रुग्ण मित्र गजुभाऊ कुबडे विदर्भ प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या मार्गदर्शनात कोरोना संकटाच्या काळात मदतीचा दुसरा टप्पा सुरु होवुन एकाच दिवशी 100 अतिगरजू लोकाना मदतीचा हात पहिल्या टप्प्यांत 24/4/2020 ला अतिगरजूना जेवढी होईल तेवढी मदत येत्या लॉकडाऊन च्या काळात अजुन 200-300 व्यक्तिना मदत होईल हे उद्धिष्ट मनाशी बाळगून आपल्या हिंगणघाट नगरीतिल काही सुजान नागरिक जे आपले नाव सार्वजनीक न करता शक्य तेवढी मदत करीत आहे.
या वाटपात गरजू व्यक्ती सोबत कोणताही फोटो काढून व्हायरल करायचा नाही अशी ताकीद बच्चूभाऊनी दिली असल्यामुळे कुठेही गरजू व्यक्ती सोबत मदतीचा फोटो व्हायरल झाला नाही.
खरच आपल्या नगरीत असे सुजान मानसातले माणुस आहे हे आपले भाग्यच. या उपक्रमात सातत्याने सहकार मित्र राम पोतदार, विनोद राऊत, तबरेज खा पठाण, संतोष जोशी, सचिन मोडे, महेश कुंभारे, भाष्कर सोरते, शुभम भोयर व इतर सहकारी सातत्याने सर्वोतोपरी मदतीचा हात देत आहे.