बाजारगाव (प्रतिनिधी) गजेंद्र डोंगरे
नागपूर जिल्ह्यातील व्याहाड परिसरात आज दुपारी साडेतीन ते चार च्या सुमारास जोरदार पाऊस येत असताना वीज पडल्याने यामध्ये एक जण जागीच ठार झाला असून पाच लोक जखमी झाले आहे येथे शेषराव पिसे यांच्या शेतात पराठी उपळत असताना जोरदार पाऊस आला व यामध्ये वीज पडली शेतात काम करीत असलेल्या लोकांवर वीज पडली यामध्ये गिरीश संभाजी पोहरकर वय 32 वर्ष राहणार समुद्रपूर जिल्हा वर्धा हल्ली मुक्काम व्याहाड हा खाजगी कंपनीत काम करीत होता सुट्टी असल्याने तो शेतात कामाला गेला होता इकबाल शेख वय 26 ,गजेंद्र भलावी वय 35 वर्ष ,खुशाल बेलखोडे वय 28 वर्ष , विजय नागोराव क्षीरसागर वय 40 वर्ष ,परवेज खान पठाण वय 45 वर्ष , हे सर्व राहणार व्याहाड जखमी झाले आहे त्यांना गावातील लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड येथे उपचारासाठी आणले होते यामधील तिघांना खुशाल बेलखोडे , गजेंद्र भलावी ,विजय क्षिरसागर, यांना मेडिकल नागपूर येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले शरद पिसे हा शेतात होता त्याला काहीच झाले नाही तो सुखरूप होतात त्यांनी गावातील काही लोकांना माहिती दिल्याने गावातील लोकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते हे सर्व शेषराव पिसे यांच्या शेतात पराठी उघडत असताना ही घटना घडली आहे असे जखमी लोकांनी पोलीसांना माहिती दिली मृतक गिरीश पोहरकर याला दोन वर्षाचा मुलगा आहे असुन तो अपंग असल्याचे सांगण्यात येत आहे हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या व्याहाड येथे ही घटना घडली असून पोलिसांना घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारींन दुर्गे व विनोद नरवाडे उपनिरीक्षक पोलीस हवालदार नितीन खोबे, कमलेश ठाकरे ,विशाल तोडासे घटनास्थळी जखमींची विचारपूस केली असून पुढील तपास विशाल तोडासे करीत आहे
अर्थ व शिक्षण सभापती जिल्हा परिषद नागपूर भारती ताई पाटील यांची रुग्णांना भेट घेऊन विचारपूस केली प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड येथे जखमी ना उपचार सुरू आहे