Wednesday, 22 April 2020

कोरोना मुळे आवटे समाजाच्या सासणकाठीचा महाप्रसाद ही अॉनलाईन

पट्टणकोडोली : (साईनाथ आवटे) सर्वत्र सुरू असलेल्या कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमी वर लाॅकडाऊन सुरू असलेने सरकारच्या आदेशानुसार कोणत्याही प्रकारची यात्रा, उत्सव, महाप्रसाद करता येत नसल्याने सालाबादाप्रमाणे साजरी होणारी आळते येथील धुळोबा देवाची यात्रा रद्द झाली. त्यामुळे पट्टणकोडोली येथील आवटे समाजाची धुळोबा सासनकाठी कार्यक्रम रद्द झाला मात्र यात्रेनंतर होणारा महाप्रसाद समाजातील युवकांच्या भन्नाट आॅनलाईन युक्ती मुळे ठरलेल्या दिवशी सरकारच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करत नियोजनबद्ध रितीने पार पडला. व्हाॅटसप ग्रुप वरील चर्चेप्रमाणे प्रसाद आपापल्या घरी प्रत्येकाने तयार केला. ठरलेल्या वेळी धुळोबा च्या नावानं चांगभलं चा गजर ग्रुप वर झाला आणि घरातील सर्वानी महाप्रसादाचा लाभ घेतला. या युवकांच्या युक्तीचे समाजातील जेष्ठांनी मात्र याचे तोंड भरून कौतुक केले आणि म्हणाले धुळोबा देवाच्या मनातचं होत म्हणुन सर्वत्र लाॅकडाऊन असताना हि सासनकाठी चा प्रसाद मात्र सोशलमिडीया मुळे यावर्षी ही आपापल्या घरी का होईना झाला त्यामध्ये खंड पडला नाही.

No comments:

Post a Comment