Wednesday, 29 April 2020

साके व्हनाळी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊसवाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले : , काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत

साके व्हनाळी परिसरात  वादळी वाऱ्यासह पाऊस
वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले : , काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत 

साके प्रतिनिधी ः सागर लोहार
कागल तालुक्याच्या पश्चिम भागात बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या वळीव पावसाने परिसराला सुमारे तासभर झोडपून काढले. या पावसामुळे माळरानातील पिकांना दिलासा मिळाला आहे तसेच शेतीच्या मशागती कामांना हा पाऊस पूरक झाल्याने  शेती वर्गातून समाधान व्यक्त होत आहे वादळी वाऱ्याने डॉ तानाजी निऊंगरे यांच्या जनावारांच्या गोठ्याचे पत्रे उडाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे पावसामुळे कांही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे. 
गेल्या चार दिवस वातावरणात उष्मांक वाढला होता बुधवारी    दुपारी झालेल्या समाधानकारक पावसामुळे  पेरणीपुर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.

No comments:

Post a Comment