गांधीनगर : प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
गांधीनगर (ता. करवीर) येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल वीस जणांना चावा घेऊन जखमी केले. जखमींवर येथील शासकीय वसाहत रुग्णालयात सर्व ते उपचार करण्यात आले. पैकी दहा जणांना कसबा बावडा येथील शासकीय सेवा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे शासकीय वसाहत रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. विद्या पॉल यांनी सांगितले. दरम्यान एकाच वेळी इतक्या जणांना चावा घेऊन जखमी केल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या पिसाळलेल्या कुत्र्याला ग्रामस्थांनी मारून टाकले.
एका पिसाळलेल्या कुत्र्याने गांधीनगरमध्ये बऱ्याच जणांना चावा घेऊन जखमी केले. त्यातील 20 जखमींवर शासकीय वसाहत रुग्णालयात सर्व ते उपचार करण्यात आले. जखमींना कुत्रे चावल्यानंतर द्यायची लस टोचण्यात आली. या जखमींपैकी काहीना गंभीर जखम झाली. 20 पैकी दहा जणांना पुढील तपासणीसाठी कसबा बावडा येथील शासकीय सेवा रुग्णालयात पाठविण्यात आले. मोठ्याप्रमाणावर आलेल्या जखमींमुळे वसाहत रुग्णालयात एकच गडबड उडाली. पण तेथील डॉ. चंद्रकांत कुराडे व परिचारिकांसह सर्व कर्मचाऱ्यांनी ताबडतोब उपचार केले.
दरम्यान, ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण यांना भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करा, असे शासकीय वसाहत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या पॉल यांनी बजावले.
.........
फोटो
.........
गांधिनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेले जख
संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
No comments:
Post a Comment