*कसबा बावडा,दि.18 एप्रिल 2020
कसबा बावडा परिसरातील उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्रमांक 11 कसबा बावडा कोल्हापूर या शाळेने स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले. दिनांक 13 एप्रिल रोजी MSTS परीक्षेचा निकाल जाहिर झाला.यामध्ये यश संपादन करणारे विद्यार्थी समर्थ जगदीश चौगले इयत्ता 2 री शहर स्तर तृतीय क्रमांक, दिशा सुनिल कांबळे इयत्ता 3 री शहर स्तर तृतीय क्रमांक, जान्हवी प्रकाश ताटे इयत्ता 4थी शहर स्तर प्रथम क्रमांक, निखिल रमेश सुतार इयत्ता 4थी तृतीय क्रमांक मिळवला.यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सुजाता अवटी, तमेजा मुजावर, विद्या पाटील. गुणवंत विद्यार्थी व सर्व शिक्षक स्टाफ यांचे हार्दिक अभिनंदन. यांना प्रेरणा देणारे मुख्याध्यापक अजितकुमार पाटील, नागरसेविका माधुरी लाड,प्राथमिक शिक्षण समितीचे सभापती श्रावण फडतारे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश सुतार तसेच शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा अनुराधा गायकवाड,दीपाली चौगले, आनंदा लाखे, नीता घाटगे, सोनली जामदार. यांच्याकडून गुणवंत विद्यार्थी व सर्व शिक्षक स्टाफ यांचे फोनद्वारे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
No comments:
Post a Comment