संभाव्य महापूराच्या परिस्थितीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्हयांचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांची पाणी व्यवस्थापनासाठी समन्वय समितीची स्थापना करावी, तसेच महापूराचे पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनातील माहिती अशी, ऑगस्ट २०१९मध्ये आलेल्या महापुरामळे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हयातील शेतकरी, छाटे मोठे उदयोजक, व्यापारी यांचे प्रचंड नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झाले. पुणे - बंगळूर महामार्गावर महापुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. यावर्षी ही हवामान खात्याने पाऊस जादा प्रमाणावर पडेल अशी शक्या वर्तवली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी
सर्वच धरणांमध्ये पाणीसाठी जास्त प्रमाणवर शिल्लक आहे. त्यामुळे प्रचंड पाऊस झाल्यास महापूराचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्हयातील शेतकरी, उदयोजक व व्यापारी यांना प्रचंड अर्थिक नुकसानीस परत एकदा सामोरे जाण्याची शक्यता आहे.
सध्या कोरोना या विषाणूमुळे लोकांना आपण विलगीकरण कक्षात ठेवत आहे. महापूर आपल्यास गावा गावातील लोकांना गावातून बाहेर एकत्र ठेवण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे कोरोनाचाही धोका वाढू शकतो. या सर्व बाबींचा विचार करून आत्तापासून शासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी अलमट्टीच्या धरणातील पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी दोन्ही राज्यांत समन्वय होणे गरजेचे असून, त्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याशी आत्तापासूनच संपर्क करावा व दोन्ही राज्यांची मिळून एक समिती तयार करावी. अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळविणेसाठी प्रयत्न व्हावेत. तसेच कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन जिल्हयांच्या पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींच्यासह स्थानिक समन्वय समिती बनवावी. जी समिती कृष्णा, वारणा, कोयना, पंचगंगा या नदयांवर असणाऱ्या धरणांच्या पाण्याच्या विसर्गावर लक्ष ठेवेल, जेणेकरुन भविष्यात येणारा महापुराचा धोका टाळणे शक्य होईल, असा विश्वास खासदार माने यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment