Saturday, 2 May 2020

शिगावात ग्रामस्थांना 3 हजार मास्कचे वाटप

शिगावात ग्रामस्थांना 3 हजार मास्कचे वाटप 

शिगाव:-  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिगाव (ता. वाळवा) येथे राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे संचालक प्रदीपकुमार पाटील व माजी उपसरपंच विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिगाव दक्षिण भाग विकास सोसायटी व राजारामबापू पाटील पाणीपुरवठा संस्था यांच्यावतीने गावातील ग्रामस्थांना तसेच कोरोना विरोधात लढा देण्यासाठी अहोरात्र सेवा करणारे पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आदींना मास्कचे वाटप करण्यात आले.
       यावेळी प्रदीपकुमार पाटील म्हणाले कोरोनाचा शिरकाव खेडेगावांमध्ये झाला तर त्याला रोखणे कठीण होईल म्हणून सर्वजण नियोजनबद्ध कोरोना विरोधात लढा देत आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात जावे लागते त्यांना आम्ही प्राधान्याने मास्कचे वाटप केले आहे. यावेळी राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या संचालिका मेघाताई पाटील, पाणीपुरवठा चेअरमन अमर पाटील, संपतराव पाटील, मधुकर पाटील, दक्षिण भाग सोसायटी व्हा चेअरमन श्रीरंग फारणे, ग्रामपंचायत सदस्य दिग्विजय पाटील, माजी वाळवा पंचायत समिती सदस्या छायादेवी बारवडे, युवा नेते प्रतीक पाटील, महेश पाटील, पोलीस पाटील नरेंद्र मधाळे, ग्रामसेवक आर.डी. कमाने, गणपतराव कोळी, विश्वासराव कोळी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment