Saturday, 2 May 2020

टँकरमधून प्रवास करणा-या तिघांवर कारवाई - वडगांव पोलीसांची दक्षता

टँकरमधून प्रवास करणा-या तिघांवर कारवाई - वडगांव पोलीसांची दक्षता 
    पेठ वडगांव / वार्ताहर - 
  मुंबईतून कोल्हापूर पर्यत प्रवाश्यांना आणण्याचा प्रयत्न आज वडगांव पोलीसांच्या दक्षतेमुळे फसला आहे. पण मुंबई ते कोल्हापूर येथपर्यंत बर्‍याच नाक्यांवर का अडवलं नाही हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. 
टँकरमधून कोल्हापूर मार्गे गोव्याला जाणा-या तिघांना वडगांव पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

      याबाबत अधिक माहिती अशी की वरील सर्वजण टँकर क्रमांक DD03KA9435 मधून प्रवास करत होते.टँकरचालकाने  या दोन प्रवाशांना कळंबोली,पनवेल येथून प्रवासी म्हणून घेतले होते.हा टँकर कणेगाव जि सांगली चेकपोस्ट वर आला असता वडगांव पोलिसांच्या तपासातून हा प्रकार समोर आला.या तिघांना कोल्हापूर सीपीआर दवाखान्यात तपासणी साठी पाठवले असून टँकर वडगांव पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान अशाचप्रकारे टेंपोतून प्रवास करणाऱ्या दोघांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेचे समजते. 

No comments:

Post a Comment