वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालय तर तालुका स्तरावर तहसिलदार करणार निर्गमीत
वाशिम दि.०३ (m आरिफ पोपटे )- उद्या दि.०४ मे पासून ते १७ मे पर्यंतच्या लॉकडाऊन ३.० ची सुरुवात होते आहे. त्यादृष्टीने पूर्णपणे ग्रिनझोन मध्ये येणार्या वाशिम जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी मा.हृषीकेश मोडक यांनी काही महत्वाचे मार्गदर्शक मुद्दे प्रशासनाला कार्यान्वित करणेसाठी तर जनतेला पालन करणेसाठी आपले आदेशात दिलेले आहेत.
याबाबत कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाल्यास संबंधीतांचे विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. भाग-१ मधील तरतुदी वगळता इतर सर्व तरतुदी कॉन्टेंन्मेंट झोन साठी लागू असणार नाहीत. भविष्यात जिल्ह्यात कोठेही कोव्हीड-१९ चा रुग्न आढळून आल्यास अशा ठिकाणी कोन्टेंन्मेंट झोन घोषीत करण्यात येईल व भाग एक मधील तरतुदी वगळता दिलेल्या सर्व तरतुदी रद्द करण्यात येतील.
-----------------------------------------------------------------------------------------------------
खालील प्रमाणे निर्देश आहेत भाग -१
१) ट्रेन व त्याद्वारे प्रवासी वाहतूक पुर्णपणे बंद राहील
२) अधिकृत परवानगी शिवाय परराज्यातून वाशिम जिल्ह्यात व जिल्ह्यातून परराज्यात प्रवासाला पूर्णत: बंदी
३) सार्वजनीक व खाजगी प्रवासी वाहतुकीची सर्व वाहने रिक्षा सह बंद राहतील
४) शाळा, कॉलेज, शैक्षणीक संस्थान पुर्णपणे बंद राहतील.
५) आरोग्य, गृह व इतर शासकीय अधिकारी कर्मचारी सोडून इतरांसाठी आदरातिथ्य सेवा पूर्णपणे बंद राहील
६) सर्व चित्रपटगृहे, मॉल, स्पोर्टस क्लब, स्विमींग पुल, बार पूर्णपणे बंद राहतील.
७) सर्व सामाजीक/राजकीय/क्रिडा/धार्मीक कार्यक्रमांवर बंदी राहील.
८) सर्व धार्मीक स्थळे बंद राहतील
९) केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, चहा टपरी, पानटपरी, उपहारगृह, ढाबे पुर्णपणे बंद राहतील.
१०) दारु दुकाने सुरु करण्याबाबत स्वतंत्र्य आदेश निर्गमीत करण्यात येतील. तोपर्यंत दारु दुकाने पुर्णपणे बंद राहतील.
-----------------------------------------------------------------------------------------------------
खालील प्रमाणे निर्देश आहेत भाग -२
दुकाने सोशियल डिसटेंसींग चे पालन करुन उघडण्यास मान्यता राहील. मास्क वापर बंधनकारक. दुकानासमोर सहा फुटाचे अंतरावर मार्कींग दुकानदारास करावे लागेल. दुकानात एकावेळी ५ पेक्षा जास्त इसम असता कामा नये.
१) सर्व प्रकारची दुकाने, पेट्रोल पं सकाळी ८.०० ते दुपारी २.०० पर्यंत सुरु राहतील. सर्व प्रकारचे दुकाने व आस्थापनांच्या कर्मचार्यांसाठी पासेस बंधनकारक राहतील. वाशिम शहरासाठी हे पासेस जिल्हाधिकारी कार्यालय तर इतर जागांवर तहसीलदार ह्या पासेस निर्गमीत करतील.
२) एमआयडीसी भागात उद्योगधंदे सकाळी ७.०० ते रात्री ७.०० या वेळेत सुरु राहतील. येथे काम करणार्या कर्मचार्यांना पास बंधनकारक राहील.
३) दारु सोडून इतर कोणत्याही इतर वस्तुंसाठी ऑनलाईन सुविधा चा वापर करता येऊ शकेल. सकाळी ७.०० ते रात्री ७.०० अशी यासाठीची वेळ राहील. यासाठी सुद्धा पासेस बंधकारक राहतील.
४) सर्व बँक सकाळी ८.०० ते दुपारी २.०० पर्यंत राहतील
५) अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोक राहू शकतील. यांत मास्क लावणे व सोशियल डिस्टंसींग महत्वाचे
६) वैद्यकीय सेवा २४ तास सुरु राहतील.
No comments:
Post a Comment