गेले सहा आठवड्यापासून कडक लॉकडाऊन व संचार बंदी मुळे बंद असणारी रस्त्याची कामे पुन्हा सुरू झाली आहेत. सैनिक टाकळी ते अकिवाट बागी रस्ता रुंदीकरणास सह मजबुतीकरणासाठी निधी उपलब्ध झाला होता. या कामाचा प्रारंभ फेब्रुवारी महिन्यात झाला होता . रस्त्याच्या दोन्ही बाजूचे रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले होते .दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कामे थांबवण्यात आली होती . आता पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांना कसरत करावी लागणार आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशभर संचारबंदी लागू झाली होती त्यामुळे बांधकामासह रस्त्यांची कामेही ठप्प झाली होती. काही कामावरती परराज्यातील मजूर असल्याने लॉकडाऊन काळामध्ये कामाविना थांबावे लागले होते. सध्या ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये शिथिलता आल्याने रस्ता कामाला सशर्त परवानगी दिली आहे. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत या कामांना प्रारंभ झालेला आहे .
No comments:
Post a Comment