मराठा काॅलनी नागरिकांच्या वतीने पोलीस व म.न.पा. सफाई कामगारांचा सत्कार
कसबा बावडा ता. 4
येथील मराठा काॅलनीत कोरोनाचा रूग्ण सापडल्यानंतर गेल्या तीस दिवसापासून काॅलनी संपूर्ण भीतीच्या छायेखाली होती. पण आज मराठा काॅलनी प्रतिबंधित आदेशातून मुक्त करण्यात आल्या नंतर कोरोनाचा संसगॆ इतरत्र पसरू नये यासाठी गेल्या तीस दिवसापासून पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त केला होता. तसेच सफाई कामगारांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली होती. या कामाची पोच पावती म्हणून काॅलनीतील नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळ्या काढून फुलांचे सडे टाकून पुष्पवृष्टी करत पोलीसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सकाळी दहा वाजता मराठा काॅलनीतील नागरिकांनी आयोजित केलेल्या या कायॆक्रमास पोलीसांवर व म.न.पा. सफाई कामगारांवर फुलांची मुक्तपणे उधळण करत टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट करत आभार व्यक्त केले. पहाटेपासूनच आपआपल्या दारात रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. पोलीस बांधव व म.न.पा. कामगारांनबद्दलचा मान त्यांच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. यावेळी नागरिकांनी स्वत:हून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात आले होते.
याप्रसंगी महापौर सौ. निलफोर आजरेकर, जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. अभिनव देशमुख, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, ए. पी. आय. रविराज फडणीस, नगरसेविका माधुरी लाड, तसेच भागातील नागरिक उपस्थित होते. तसेच या कायॆक्रमाचे नियोजन शिवाजी ठाणेकर, समीर मुजावर, नामदेव ठाणेकर, मोहित मंदारे, सचिन पाटील, कपिल पुंगावकर, संदीप वाडकर, दिगंबर साळोखे, सचिन मोरे आदिसह मराठा काॅलनी मित्र मंडळ यात सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment