कोल्हापूरात लॉकडाऊनमध्ये दारु विक्रीला परवानगी - तळीरामांची गर्दी
कोल्हापूर प्रतिनिधी - कोल्हापूरात किरकोळ दारु विक्रीला परवानगी देण्यात आली आहे असे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी निर्देश दिले आहेत. पण ही परवानगी देताना लॉकडाऊन काळात संचारबंदी आणि लॉकडाऊन च्या अटींचे पालन करण्यास सांगितले आहे. दुकानासमोर पाच पेक्षा अधिक ग्राहक नको आणि दोन ग्राहकांमध्ये सहा फुटाचे अंतर असावे, ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग म्हणजेच ताप मापन आणि वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहा ही ठेवून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझर वापर सक्तीचे अशा अटी शर्तीनुसार ही परवानगी देण्यात आली आहे. याचे उल्लंघन केले तर दुकानदारांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान या परवानगी अगोदरच काही दारु विक्रेत्यांनी परवानगी मिळाली हे गृहीत धरून या अटी पालनासाठी सर्व व्यवस्था सुरु केली आहे. पण काही ठिकाणी तळीराम मात्र गर्दी करुन सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवत आहेत. अशा तळीरामांना आवरताना विक्रेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.
तर शहरात काही ठिकाणी तळीरामांच्या रांगा लागल्या असुन रांगेवरुन किरकोळ वादावादीचे प्रसंग घडत आहेत. यामुळे लॉकडाऊनचा फज्जा उडणार हे नक्की.
लॉकडाऊन काळात दारु विक्रीला लगाम असल्याने गुन्हेगारी प्रमाणात भरपूर घट झाली होती. पण दारु अभावी कोणाचाही मृत्यू झाला नाही.
मग दारु दुकाने उघडण्यासाठी खरी घाई कोणाला ? सरकारला, विक्रेत्यांना की दारुड्यांना असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.
भविष्यात जर दारुड्यांमुळे गुन्हेगारी व कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला तर याला जबाबदार कोण असा सवाल जबाबदार नागरिकांकडून केला जात आहे.
No comments:
Post a Comment