मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी एक ट्विट द्वारे लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे अशी माहिती दिली. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी याबाबत एक अध्यादेश जारी केला आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे. त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन कायम राहणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. यामुळे खबरदारी म्हणून रेड झोन व कंटेनमेंट झोन मध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता नसणार आहे तर अॉरेंज आणि ग्रीन झोनमध्ये नेमके कोणते उद्योग व व्यवहार सुरू होणार याबद्दल माहिती येणे बाकी आहे.
No comments:
Post a Comment