Sunday, 17 May 2020

पट्टणकोडोली येथे धोकादायक विद्युत खांब कोसळण्याच्या मार्गावर - महावितरणचे दुर्लक्ष

पट्टणकोडोली : - (साईनाथ आवटे) पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील पाचगाव पाणंद रस्त्यावर असलेल्या बाळासाहेब आवटे यांच्या शेतातील विद्युत खांब ब-याच दिवसापासून तिरका झाला असून त्याला फक्त झाडाचा आधार असल्याने तो उभा आहे. तसेच या खांबाचा खालील लोखंडी भाग अतिशय गंजलेल्या असल्याने हा कधी कोसळून पडेल अशा स्थितीत उभा आहे. धोकादायक बनलेल्या या खांबाबाबत शेतकऱ्यांनी विद्युत महावितरण कंपनी कडे वारंवार लेखी तसेच तोंडी करून ही त्यांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. सध्या सुरू झालेल्या वळवाचा पाउस व सुटणारा प्रचंड वारा या मुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे तरी महावितरण कंपनीने हा गंजलेला विद्युत खांब लवकरात लवकर बदलून घ्यावा अन्यथा या मुळे होणाऱ्या धोक्यास सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची राहील असे मत  भागातील शेतकर्‍यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment