अॅड . अमोल कळसे
उदगीर : येथील कोरोना रुग्णालयात रविवारी (ता.१७) दुपारी पावणे एकच्या सुमारास व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या एका ६८ वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सतीश हरिदास यांनी दिली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी या रुग्णास येथील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अगोदरच रक्तदाब व मधुमेहाचा त्रास असलेल्या या रुग्णाला सुरवातीला येथील येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे लक्षणे पाहून त्या डॉक्टरांनी या रुग्णास कोरोना रुग्णालयात पाठविले होते. तेथे त्यांचा स्वॅब घेऊन लातूरला तपासणीसाठी पाठवले असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
त्यानंतर या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचा घर परिसर म्हणजे आनंदनगर, नांदेड नाका सील करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने एका पथकाची नियुक्ती करून या भागातील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. शिवाय लागण झालेल्या या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी लातुरला पाठवण्यात आले आहेत.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उदगीर शहरामध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला अहवाल येताच दोन तासात या महिलेचाही मृत्यू झाला होता.
No comments:
Post a Comment