Sunday, 17 May 2020

जिल्हा बंदीचा आदेश डावलून मुंबईहून उदगीरला येणाऱ्या तेवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल !


अॅड . अमोल कळसे
उदगीर :मुंबई येथे कामधंद्याच्या निमित्ताने गेलेल्या तेवीस लोकांनी कसलीही परवानगी न घेता, आयशर कंपनी च्या टेम्पो क्रमांक एम एच 43 बी 5397 चा चालक संतोष तुकाराम गायकवाड रा.येणकी तालुका उदगीर याने आपल्या आयशर कंपनीच्या टेम्पो मधून दिनांक 17 मे 2020 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामग्रह नळेगाव रोड उदगीर च्या पश्‍चिमेस तीन किलोमीटर अंतरावर ह्या टेम्पो मधून तेवीस लोकांना मुंबईहून उदगीरला आणले. या प्रवासासाठी कोणत्याही पद्धतीची पूर्वसूचना किंवा पूर्वपरवानगी घेतलेली नाही. टेम्पो चालकाच्या आणि त्या टेम्पो मधून प्रवास करणाऱ्या नागरिकांची ही कृती महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या लॉक डाऊन आणि लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी लागू केलेल्या संचारबंदी च्या आदेशाचे उल्लंघन आहे. या कृतीमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढेल. अशी घातक कृती करून स्वतःचे व इतर जनतेच्या सुरक्षेस, व्यक्तिगत सुरक्षिततेस बाधा आणणारे आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश माहित असताना सुद्धा आणि पोलिस विभागाच्या वतीने वेळोवेळी यासंदर्भात आदेशाचे पालन करण्याचे जाहीर आवाहन केले असतानासुद्धा या आदेशाची पायमल्ली करून सार्वजनिक रोडवर मुक्त संचार केला. कोणत्याही सुरक्षेची काळजी न घेता, संसर्ग पसरण्याची हायगय कृती करून या 23 आरोपीतांनी आयशर कंपनीचा मालवाहतूक टेम्पो घेऊन मुंबई ते उदगीर असा अवैद्य प्रवासी वाहतूक केली आहे. यामध्ये जळकोट तालुक्यातील मंगरूळ तसेच कासराळ तालुका उदगीर, गुरदाळ तालुका उदगीर, बोरोळ तालुका देवनी, येणकी  तालुका उदगीर, वांजरवाडा तालुका जळकोट या गावात राहणारे हे सर्वजण उदगीर येथे येत असताना पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्यावर गु.र.नं 188/ 20 कलम 188, 269 भा. दं. वि. यासह  अधिनिय  covid-19 उपायोजना 2020 कलम 234 साथीचे रोग प्रतिबंधक कायदा 66 (1) 192 मो.वा. का. अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ज्येष्ठ पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल शेळके हे करत आहेत. कालच बोरतळ तांडा तालुका उदगीर येथील चौघांनी मुंबई येथून उदगीर येथे आणि त्यानंतर बोरफळ तांडा येथे कोणतीही परवानगी न घेता प्रवास करून जिल्हा बंदी आणि संचारबंदी च्या आदेशाचे उल्लंघन केले. म्हणून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी तात्काळ प्रशासनाची संपर्क करून योग्य ती काळजी घ्यावी. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment