Saturday, 2 May 2020

बोपापूर येथे गरजूंना किराणा किट वाटप

बोपापूर येथे गरजूंना किराणा किट  वाटप                  प्रतिनिधी: प्रमोद झिले येरला हिंगणघाट

येरला:- बोपापूर येथे गरजू 25 कूटूबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. ग्रा.पं.सदस्य यानी पुढाकार घेत गरजू लोकांसाठी समोर येत फळ नाही फुलाची पाकळी मदत केली.या पुढाकारामध्ये अनिल दौलतकर, पत्रकार अविनाश वाघ, ग्रा.पं.सदस्य विवेक दौलतकर, अभिजित दौलतकर, ग्रा.पं.सदस्य लता वाघ, माधुरी पाळेकर, विशाल दौलतकर, कमलेश दौलतकर, समीर दौलतकर या सगळ्या सामाजिक कार्यकर्ते यानी स्वत: वर्गणी गोळा करुन गावातील बेघर वस्तिमधील अती गरजू कुटुंबाला एक मदतीचा हात दिला. यामध्ये कोणिही स्वत: चे फोटो न काढता मानवता धर्माचे पालन करत जनसेवा हिच ईश्वर सेवा मानत गावातील सामाजिक कार्यकर्ते यानी देव हा मानसात असतो हे सिद्ध केल्याचे दिसुन येत आहे.

No comments:

Post a Comment