Saturday, 2 May 2020

कंदलगाव शेत - शिवारातील विद्युत वाहिनीचा धोका वाढला .

शेत - शिवारातील विद्युत वाहिनीचा धोका वाढला ...
कंदलगाव ता .२ ,
( छायाचित्र . प्रकाश पाटील )

      कंदलगाव परिसरातील सर्वच शेत- शिवारात पिकांना पाण्याची सोय व्हावी यासाठी कृषी पंपाना तारांचा  प्रवाह जोडला आहे . गेल्या अनेक वर्षापासून शिवारात लोंबकणाऱ्या विद्युत वाहिनीचा ताण काढला नसल्याने त्या धोकादायक स्थितीत लोंबकळत आहेत .
      सध्या वळीवाचे दिवस असून वादळ- वाऱ्यामुळे अनेकदा वाहिनींचा स्पर्श होऊन शॉर्टसर्किट होण्याचे प्रकार घडत आहेत . आशा वेळी शेतात चरणारी जणावरे , मजूर व शेतकरी ही असल्याने जिवीत हानी होऊ शकते .
      संबंधित विभागाने हा विषयी गांर्भीयाने घेऊन वाहिनींचा ताण काढावा अशी मागणी होत आहे .
फोटो ओळ - कंदलगाव येथील कचनचा माळ येथील धोकादायक विद्युत वाहिनी .

No comments:

Post a Comment