सैनिक टाकळी प्रतिनिधी
खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात किरणोत्सव
प्रत्येक वर्षी ५ ते १० मे च्या दरम्यान,वैशाख शुक्ल १४ चित्रा नक्षत्रला हा योग येतो. भारतामध्ये अशी बोटावर मोजण्याइतपत मंदिरे आहेत जिथे शिवलिंगावर सूर्य किरणांचा अभिषेक होतो. त्यापैकी खिद्रापूरचे एक मंदिर आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील महाराष्ट्र - कर्नाटकच्या सिमेवरील खिद्रापूर हे एक छोटंसं गाव आहे.या गावामधील अद्भूत शिल्य कलेचे कोपेश्वर मंदिर एक जागृत देवस्थान व पर्यटनाचे केंद्र आहे. मुघल आक्रमणात मोडतोड झालेल्या या मंदिराविषयी अनेक दंतकथा प्रचलीत आहेत. त्यापैकी एक..
कर्नाटकमधील रायबाग येथील बंकनाथ, संकेश्वर येथील शंखनाथ आणि महाराष्ट्रामधील खिद्रापूर येथील कोपेश्वर या तीन शिवलिंगाचे दर्शन सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत करणाऱ्या भक्ताला सदेह स्वर्ग मिळत असायचा.असे वरदान भगवान शंकराने आपल्या भक्तांना दिले होते. त्यामुळे अनेक जण या मार्गाने स्वर्गात जाऊ लागले.देवता चिंतीत झाले.त्यांनी भगवान विष्णूचा धावा केला. शिवभक्तांची साधना खंडीत करण्यासाठी विष्णू स्वतः धोपेश्वराचे रूप धारण करून खिद्रापूर येथील मंदिरामध्ये कोपेश्वराच्या समोर उभा राहिले. म्हणून या ठिकाणी कोपेश्वराअगोदर धोपेश्वराचे दर्शन होते. इथल्या दोन शिवलिंगाचे हे रहस्य आहे.
भक्ताची साधना खंडीत करण्याच्या उद्देशाने या मंदिराचा रचनासुद्धा दिसते. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मानसिकता बदलते.
No comments:
Post a Comment