कोल्हापुर प्रतिनिधी - -
जिल्ह्यातील दोन हजार नवजात बालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेबी किटची काँग्रेस पक्षाकडून मदत करण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि प्रतिमा पाटील सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे हे बेबी किट सुपूर्द करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरामध्ये काँग्रेस पक्षाकडून सामान्य नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा काँग्रेस, महिला काँग्रेस, एन. एस. यु. आय. आणि युथ काँग्रेस यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील सरकारी, खाजगी रुग्णालयात जन्मलेल्या सुमारे दोन हजार नवजात बालकांसाठी 'बेबी किट'चे वाटप करण्यात येणार आहे. या बेबी किटचे वाटप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घरपोच करण्यात येणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांच्या हस्ते काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे हे बेबी किट सुपूर्द करण्यात आले. नवजात बालकांना या बाबी आवशयक असतात. मात्र कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे सर्व दुकान बंद असल्याने या बालकांना मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण ही मदत करत असल्याचे मत सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसकडून विविध उपक्रम घेतले जातात. फेब्रुवारीनंतर जिल्ह्यात ज्या बालकांचा जन्म झाला आहे त्या बालकांना मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण तत्पर आहोत. काँग्रेस पक्षाकडून जे सामाजिक उपक्रम राबवले जातात ते यापुढेही चांगल्याप्रकारे राबवू असे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले बेबी किट हे जिल्ह्यातील जे दोन हजार नवजात बालक आहेत त्यांच्याघरी पोच करणार असल्याचे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, शहर अध्यक्षा संध्या घोटणे, प्रदेश काँग्रेसच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस सरलाताई पाटील, भारती पोवार माजी नगरसेविका, संजीवनी देसाई, पार्थ मुंडे, दीपक थोरात आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment