ना बँड.. ना बाजा.. ना बाराती... केवळ मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे प्रथमच वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे घरगुती स्वरूपात साध्या पद्धतीने वधू-वरांचे आदर्श शुभमंगल पार पडले. याप्रसंगी कोरोना विषाणूचे संकट टळले नसून खबरदारी म्हणून प्रत्येकाने सावध राहण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा गवळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले. रविवार दिनांक २४ मे रोजी दुपारी नंदुरबार तालुक्यातील वावद येथील सामाजिक कार्यकर्ते कै. रामदास जीवन लगडे यांची सुकन्या चि. सौ. कां. करिष्मा आणि नंदुरबार येथील खंडू पारुजी हुच्चे यांचा सुपुत्र चिरंजीव चंद्रकांत यांचा शुभविवाह नंदुरबार येथील देसाईपुरा भागातील निवास्थानी पुरोहिताच्या साक्षीने आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित आदर्श विवाह पार पडला. शासनाच्या सूचनांप्रमाणे लॉकडाऊन काळात नियमांचं पालन करून शारीरीक अंतर ठेवत वधूवरांना मास्क लावून उपस्थितांनी अक्षता टाकल्या. याप्रसंगी वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था धुळेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाळ भटू लगडे यांच्यातर्फे वधूवरांना गवळी समाजाचे आराध्यदैवत परमपूज्य बालब्रह्मचारी सिदाजीआप्पा देवर्षी यांची प्रतिमा भेट दिली. तसेच गवळी समाज महासंघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी वधू-वरांसह उपस्थितांना कोरोना विषाणू बाबत मार्गदर्शन करणारे माहितीपत्रक वाटप केले.कोरोनाचे संकट टळले नसून खबरदारी म्हणून प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे. मातृ पितृ छत्र हरपलेल्या वावद येथील करिष्मा या नववधूच्या भावी वैवाहिक जीवनासाठी आप्तेष्टांनी घरी राहूनच शुभेच्छा दिल्या. लॉकडाऊन काळात लग्नसमारंभातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन कमी खर्चात नंदुरबार जिल्ह्यात गवळी समाजात प्रथमच विवाह होत असल्याने निश्चितच आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे. याचे अनुकरण नंदुरबार धुळ्यासह महाराष्ट्रातील गवळी समाजबांधवांनी करावे असे आवाहन गवळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले. या आदर्श आणि घरगुती विवाह सोहळ्यासाठी वावद येथील राजेंद्र लक्ष्मण लगडे, विजय लगडे, राजेंद्र महादू लगडे, एकनाथ लगडे,विजय लगडे,हेमराज लगडे, खंडू लगडे, प्रवीण लगडे, नंदुरबार येथील यशपाल गवळी,पांडू हुच्चे, लक्ष्मण हुच्चे, धनंजय हुच्चे,दीपक हुच्चे,नरेंद्र हुच्चे, संतोष घुगरे, अण्णा घुगरे, मनोहर बारसे,महादू हिरणवाळे, संभाजी हिरणवाळे, सुभाष उदीकर,अंकुश काटकर धुळे, माधव जोमदे, लिंबाजी उदीकर, आदी उपस्थित होते. उपस्थित वर्हाडी मंडळी देखील सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करीत मास्क घातले होते.
No comments:
Post a Comment