सैनिक टाकळी प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्याविरुद्ध महाराष्ट्र सरकारने उभारलेल्या लढ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री मा.उद्धवजींनी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांशी व्हिडिओ कॉनफरन्सद्वारे संवाद साधला. शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव यांनी मा.उद्धवजींच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या कोरोना विरुद्धच्या लढ्याबद्दल आम्हां सर्व शिवसैनिकांना अभिमान असल्याची भावना व्यक्त केली व मा.उद्धवजींना कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक व जनतेतर्फे अभिमानस्पद सॅल्यूट ठोकला. शिवसैनिकांच्या या अभिमानास्पद सॅल्यूटप्रती मा.पक्षप्रमुखांनी हात जोडून दाद दिली व कौतुक केले. कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थे मार्फत प्रत्येक गावांमध्ये जागोजागी हॅन्ड सँनीटायझर बसवावेत. मनरेगा, रोजगार हमी योजना अंतर्गत दवाखाने ,शाळा ,सार्वजनिक दृष्ट्या उपयुक्त ठिकाणची कामे उपलब्ध करून लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. पावसाळ्यापूर्वी कर्नाटक राज्याशी समन्वय ठेऊन पूर परिस्थिती वरती नियंत्रण ठेवावे.अशा प्रमुख मागण्या जाधव यांनी केल्या. यावेळी मा.उद्धवजींनी सर्व शिवसैनिकांनी कोरोनासदृश्य स्थितीत केलेल्या कामाचे कौतुक व अभिनंदन केले. माझा शिवसैनिक हा संकटावेळी धावून जाणारा,संघर्ष करणारा आहे. मला याची नक्कीच खात्री आहे की शिवसैनिकांना या परिस्थितीत काम करण्याची व कोरोनावर मात करण्याची प्रचंड इच्छा आहे. परंतु हा धोका अनाकलनीय आहे, त्यामुळे तुम्ही सर्व शिवसैनिकांनी स्वतःची व आपल्या तमाम जनतेची काळजी घ्यावी. या धोक्याला मात देऊन आपल्याला इथून पुढच्या कोणत्याही संकटाला चारीमुंड्या चीत करायचंय व महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासास पात्र व्हायचंय व त्यांचे आशिर्वाद मिळवायचे आहेत,असा संदेश मा.उद्धवजींनी दिला यावेळी शिवसेना हुपरी शहर कार्यालय येथे विभागप्रमुख विनायक विभूते,शहरप्रमुख अमोल देशपांडे,नगरसेविका सौ.पूनम राजेंद्र पाटील,नगरसेवक बाळासाहेब मुधाळे,माजी विभागप्रमुख राजेंद्र पाटील,अर्जुन मुरलीधर जाधव,सुनील सांगवडे व शिवसैनिक उपस्थित होते
No comments:
Post a Comment