Monday, 25 May 2020

निगवे खालसा गावातील मुंबईहून आलेल्या तरुणाचा अहवाल कोरोना पोझीटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण



गावच्या सीमा सील ४ दिवस १०० % लॉक डाऊन होणार
निगवे खालसा प्रतिनिधी :- निगवे खालसा गावातील मुंबईहून गावी आलेल्या ३३ वर्षीय तरुणाचा अहवाल काल रात्री उशिरा कोरोना पोझीटिव्ह आल्याने गावात एकच खळबळ उडाली गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत व दक्षता समितीने गावच्या सीमा सील करून गावात ४ दिवस १००% लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
      मुंबई येथे कंपनीत नोकरीस असलेला हा ३३ वर्षीय तरुण आपली ३१ वर्षीय पत्नी व २ वर्षाच्या मुलगीस एका वाहनाने कोल्हापूर मध्ये आले. त्यानंतर डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये तपासणी करून सोमवार दिनांक १८ मे रोजी रात्री निगवे खालसा गावी आले त्यांना आल्यावर होम क्वॉरंटाइन करण्यात आले होते. गुरूवार दिनांक २१ मे रोजी सदर तरुणाला ताप आल्याने सी. पी. आर. मध्ये तपासणी साठी पाठिवण्यात आले. त्यानंतर रविवार दिनांक २४ मे रोजी रात्रौ ११ नंतर त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने सर्व गावात खळबळ उडाली.
       आज सोमवार दिनांक २५ रोजी सकाळीच हे वृत्त गावात वाऱ्या सारखे सर्वत्र पसरले. सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. इस्पुरली पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण मॅडम यांनी तात्काळ भेट देऊन ग्रामपंचायतीचे सरपंच, उसरपंच सर्व सदस्य दक्षता कमिटी याची बैठक घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गावच्या सर्व सीमा सील करून गावातील सर्वत्र व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
       दरम्यान सदर तरुणाची पत्नी वय वर्ष ३१ लहान मुलगी वय वर्ष २ यांनाही अँब्युलन्स मधून तपासणीसाठी आज दुपारी बारा वाजता कोल्हापूरला सीपीआर रुग्णालयात  पाठविण्यात आले आहे.
      इस्पुरली आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ शैलजा पाटील यांनी भेट देऊन आरोग्य सहाय्यक के एस पाटील विकास लवटे व आरोग्य सेवक मुळीक आशा वर्कर्स मार्गदर्शन करून संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या सूचना दिल्या.
       गावात मुंबईहून ९ जण पुणे हुन ३ जण पंढरपूर हुन ३ जण गुजरात हुन १ व एक बत्तीस शिराळा सांगली हुन आलेल्या १७ पैकी १० जण संस्थात्मक क्वॉरंटाईन ६ जणांवर होम क्वॉरंटाईन तर एकाला गावी पाठविण्यात आले आहे. सदरचा तरुण त्याची पत्नी माध्यमिक शाळेत संस्था क्वॉरंटाईन होते.
        गावचे सरपंच पांडुरंग महाडेश्वर, उपसरपंच चंद्रकांत कांबळे, अशोक किल्लेदार व सर्व सदस्य पत्रकार डी एस ढगे दक्षता समितीचे तुषार पाटील, विजय पाटील, पिंटू पाटील, संदीप पाटील, शहाजी पाटील, उदय सोहनी, सचिन चांदणे, संतोष किल्लेदार, पोलिस पाटील जयदीप किल्लेदार, तलाठी महेश पाटील कोतवाल गोरक्ष गुरव, ग्रामविकास अधिकारी एस वाय कांबळे, जयंत पाटील आरोग्य सेवक मुळीक आदींनी औषधाची फवारणी करणे गावच्या सीमा सील करणेचे नियोजन केले आहे. इस्पूरली पोलिसांनी गावात पोलिस बंदोबस्त कडक केला आहे

No comments:

Post a Comment