Friday, 22 May 2020

सरकारने जनतेचा विश्वासघात केला - गोपाल पाटील राऊत

 

 मालेगाव प्रतिनिधी रजनीकांत वानखेडे 
देशात कोरोणा या विषाणूने थैमान घातले असताना महाराष्ट्र सरकार कुंभकर्णी झोपेत असून देशाच्या 35 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात असून महाराष्ट्रामध्ये 40000 च्या पुढे रुग्ण गेले असून याला महाराष्ट्रातील ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचे माजी प्रदेश सदस्य गोपाल पाटील राऊत यांनी केला 
भारतीय जनता पार्टीच्या वतीने 22 मे ला महाराष्ट्रामध्ये मेरा अंगण मेरा रणांगण या कार्यक्रमांतर्गत हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या अंगणामध्ये बसून काळे कपडे घालून काळा मास लावून सरकारचा जाहीर निषेध केला असून उद्धव ठाकरे सरकार फक्त पत्रकार परिषदा घेऊन जनतेशी खोटं बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असून आतापर्यंत या सरकारने शेतकऱ्यांना मजुरांना उद्योजकांना कुठले प्रकारे एक रुपयाची मदत केली नसून हे सरकार फक्त खोटे बोलून जनतेच्या भावनेशी छेळत असल्याचा आरोप गोपाल पाटील राऊत यांनी केला असून राज्य सरकारने आतापर्यंत मजूरांना शेतकर्‍यांना उद्योजकांना कुठल्या प्रकारची मदत केली नसून हे सरकार फक्त केंद्र सरकारच्या योजना वरच अवलंबून असून राज्य सरकारने कुठल्या प्रकारे कोणतेही पॅकेज महाराष्ट्रातील जनतेला जाहीर केलेला नाही शेतकऱ्याचे पेरणीचे दिवस जवळ आले असताना सरकारला शेतकऱ्याची कुठल्या प्रकारे चिंता नाही सर्वच स्तरावर ठाकरे सरकार अपयशी झाले असून भारतीय जनता पार्टी मालेगाव तालुक्याच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे

No comments:

Post a Comment