सैनिक टाकळी
शिरोळ तालुक्यामध्ये कोरोना चे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर गावातील तरूण मंडळे अधिकच जागृत झाली असून आपली गल्ली कोरोना संक्रमित होऊ नये यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जंतुनाशक फवारणी देखील स्वतःहून करत आहेत सध्या गावामध्ये पुणे मुंबई येथून गावकरी परतत आहेत . या लोकांचे स्वराज्य अकॅडमी येथे संस्थात्मक अलगीकरण केले आहे तर काही लोकांची घरी अलगीकरण सोय असल्याने त्यांना होम कॉरंटाईन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून येथील स्वराज्य तरुण मंडळाने निर्जंतुकीकरण करण्यासाठी पाऊल उचलले असून त्यांंनी प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहता स्वतःहूनच आपला परिसर निर्जंतुक केला.
No comments:
Post a Comment