कुरुंदवाड प्रतिनिधी
गेल्या महापुराने शेतीला बसलेला फटका ,लॉक डाऊनच्या काळात उदभलेल्या अडचणी या सर्वावर मात करत शिरटी ता शिरोळ येथील श्री भैरेश्वर बहुउद्देशीय सच्छिद्र पाईप सहकारी संस्थेने काही महिन्यांच्या कालावधीत शेकडो शेतकऱ्यांच्या क्षारपड व नापिक झालेल्या शेतीमध्ये या सच्छिद्र निचरा प्रणाली कार्यान्वित केल्याने शेतीमध्ये चांगल्या प्रकारची पिके येत असल्याने शेतकऱयांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे आज अखेर सच्छिद्र निचरा प्रणालीचे ९०% अधिक काम झालेने सदरची योजना पूर्णत्वाकडे जात आहे
या योजनेमध्ये २५० शेतकरी असून यांच्या मालकीच्या चारशे एकर शेतीमध्ये पैकी३५०एकरांमध्ये अधिक काम सध्या पूर्ण झाले आहे ही योजना यशस्वी होऊन क्षारपड व नापीक जमिनी सुपीक झाल्याने असंख्य शेतकऱयांनी ऊस खपली शाळू आदी पिके घेतली आहेत यातून त्यांना मोठा आर्थिक फायदा भविष्यात होणार आहे या योजनेकरिता जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३.५० कोटीहून अधिक रुपये कमी व्याजदरात दीर्घ मुदतीचे कर्ज शेतकऱ्यांना विकास संस्थेच्या माध्यमातून या योजनेचे मार्गदर्शक नाम.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष सहकार्यातून उपलब्ध करून दिले आहे मध्यंतरी या योजनेला काही टिकाणी गळती लागली होती व लाँकडाउन काळामध्ये जेसीबीचे चालक काम सोडून गेले आहेत अशा अनेक अडचणीवर संस्थेने मात करित योजना पूर्ववत पूर्णत्वाकडे नेत आहेत विशेष म्हणजे लाँकडाउन असताना सुद्धा सांगली येथील रेक्स पॉलिटेक्निक प्रायवेट लिमिटेड या कंपनीने पाईप उपलब्ध करून दिल्या आहेत
हि योजना यशस्वी व्हावी व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावी या करिता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शिरटिकिसान विकास सेवा संस्था ज गोंडा पाटील विकास सेवा संस्था प्रकाश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था हे विशेष परिश्रम घेत आहेत या योजनेचे मार्गदर्शक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे असून बुबनाळ येथिल इंजिनिअर सुभाष कुसनाळे यांच्या देखरेखी खाली काम पार पडतआहे
शिरटि परिसरातील शेतकऱ्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली सच्छिद्र निचरा प्रणाली ही योजना भविष्यात इतरांच्या साठी पायलट प्रोजेक्ट ठरणार हे निश्चित आहे
१) या सच्छिद्र निचरा प्रणालीमुळे शेतीच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे सध्या दोन एकर शेतीमध्ये मी सछिद्र निचरा प्रणाली केल्याने अगोदरपेक्षा माझे ऊस पीक अधिक जोमाने आले आहे मि योजनेवरति समाधानी आहे
विद्यासागर बाळू चौगुले
प्रगतशील शेतकरी
२) ही योजना यशस्वी झाल्याने नापिक जमीन सुपीक होऊन उसाचे चांगले पीक आले आहे यातून मला चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल मी या संस्था चे यड्रावकर उद्योग समूहाचे आभार मानतो
जावेद बाळू खतीब
अल्पभूधारक शेतकरी
३) शिरटी परिसरातील शेतजमिनी अतिरिक्त व पाण्याच्या वापरामुळे छारपड होऊन नापीक झाल्या होत्या या योजनेमुळे जमिनिचा पोत सुधारून अधिक उत्पन्न आम्हाला मिळणार आहे माझ्या शेतांमध्येही यशस्वी झाली आहे
बंडू रोजे
शेतकरी
No comments:
Post a Comment