Saturday, 23 May 2020

गिरगांव येथे अर्सेनिक ३० या औषधाचे वाटप


कंदलगाव - प्रतिनिधी 
    कोरोना हा आजार क्षणात येऊन जागतिक महामारी बनला आहे. या काळात घरी राहणे, सुरक्षीत राहणे  या तत्वावनुसार संपूर्ण जग कोरोनाशी जणू  युद्ध करत आहे .भावी आयुष्यासाठी सुरक्षित जनता हि देशाची महानता आहे .आणि हि महानता जपून ठेवणे हि तर प्रत्येक  भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. यालाच अनुसरून देशाची संपूर्ण प्रशासकीय  यंत्रणा दिवस रात्र कोरोना प्रतिबंधना साठी लढाई करत आहेच.  
    भारत सरकार आयुष् मंत्रालया द्वारे जाहिर झालेल्या अर्सेनिक  अल्बम ३० या  होमिओपॅथी मेडिसिनचे संपूर्ण देशभरात वाटप चालु आहे. होमिओपॅथी  हे एक शास्त्र, एक संशोधन तर एक तपश्चर्या आहे. हे तर वाघीनीचे  दूध आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात अनंतशांती बहुउद्देशिय  सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर व कसबा वाळवे आणि क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे संस्था गिरगाव यांच्या मार्फत डाॕ. दीपा कुष्ठे डाॕ.नंदिनी गावडे डाॕ, अस्विनी खोराटे डाॕ. शैलाजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  गिरगांवमध्ये  जी कोरोना प्रतिबांधक  दक्षता समिती, ग्रामसेवक, आशां वर्कर ,अगंणवाडी सेविका,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील हि लोक जिवाची परवा न करता कोरोना योद्धा बनून काम करत आहेत. यांच्यासाठी  मोफत औषध वाटप करण्यात आले . 
    यावेळी  अनंतशांती चे अध्यक्ष भगवान गुरव, माधुरी खोत, फिरंगोजी शिंदे संस्थेचे वस्ताद प्रमोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग खेडकर,पोलिस पाटील उमेश लोहार, पारिचारिका आफळे, सुरेश पाटील, विश्वजीत पाटील उपस्थित होते.

फोटो  - गिरगाव येथे औषध वाटप करताना भगवान गुरव , वस्ताद प्रमोद पाटील व इतर मान्यवर .

No comments:

Post a Comment