**
उदगीर प्रतिनिधी - गणेश मुंडे
जगात आणि देशात कोरोना या महामारी मुळे गंभीर परिस्थिती उद्भवलेली असताना कोरोना विषाणूच्या च्या संकटातून देश सध्या लाकडाऊन आहे.त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आवाहनाला साथ देत उदगीर तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त शिक्षक मनोहर हेरकर यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे.कुटुंबामध्ये पत्नी,दोन मुले, दोन सुना,नातवंडे असा 11 लोकांचा परिवार असून दोन एकर शेती अतिशय बेताची परिस्थिती असतानासुद्धा देश सेवेसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या उपस्थिती मध्ये PM CARE FUND मध्ये एक महिन्याचे पेन्शन ची रक्कम भरणार असा आग्रह धरून या संकटामध्ये मनोहरराव हेरकर गुरुजी यांनी आपला ही खारीचा वाटा म्हणून आपल्या माणुसकीचे दर्शन दाखवीले असून एकवीस हजार रुपये पीएम केअर निधीसाठी आपल्या गटाचे सदस्य व लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या साक्षीने बँकेमध्ये भरले असून समाजासाठी अतिशय प्रेरणा देणारे कार्य मनोहर हेरकर गुरुजी यांनी केले आहे. आज देश लाॅकडाऊन असल्यामुळे खूप आर्थिक संकटातून जात आहे अशा परिस्थितीत आजही समाजामध्ये परिस्थिती प्रतिकूल असली सुद्धा पण दानशूर हाच समाजामध्ये मागे नसून याचे उदाहरण म्हणजे मनोहर हेरकर गुरुजी आहेत.
यावेळी ज़िल्हा परिषद समाज कल्याण सभापती रोहिदासराव वाघमारे,जि.प.सदस्या विजयाताई बीरादार,माजी सभापती बापूराव राठोड,सभापती विजयकुमार पाटील, समाज कल्याण अधिकारी खमितकर,प्राध्यापक पंडितराव सुर्यवंशी,जिल्हा उपाध्यक्ष पंडितराव सुकनीकर,युवा नेते सागर बिराजदार ,रमेश मोमले,दिलीपराव पाटील,दयानंद सोनटक्के,प्रकाश हैबतपुरे,त्र्यंबकराव पाटील,उद्धव रक्षाळे,विशाल रंगवाळ,कल्याण बिरादार,ग्रामसेवक शेळके व गावातील नागरिक व लाभार्थी उपस्थित होते
No comments:
Post a Comment