कृषी विभागामार्फत बांधावर बियाणे व खत वाटप मोहीमे चा शुभारंभ
उदगीर प्रतिनिधी :-गणेश मुंडे
कृषी विभागामार्फत सध्याच्या लॉक डाउन च्या परिस्थितीमुळे शेतकरी परेशान असून आगामी खरिपाची पेरणी संदर्भात शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खते बी-बियाणे आदींची उपलब्धता करून देण्यासाठी या मोहिमेचा शुभारंभ उदगीर येथे
येथे मा.ना. श्री.संजय बनसोडे, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष मा.ना. श्री. राहुलभैया केंद्रे साहेब यांचे हस्ते पार पडला याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,श्री दत्तात्रय गावसाने,कृषी विकास अधिकारी, जि.प.लातुर श्री.सुभाष चोले, उपविभागीय कृषी अधिकारी , उदगीर,श्री.महेश तीर्थंकर,तहसीलदार उदगीर श्री.व्यंकटेश मुंढे, तालुका कृषी अधिकारी उदगीर सिद्धेश्वर मोकळे ,कृषी अधिकारी पंचायत समिती उदगीर यशपाल सातपुते, कृषी सहायक सुनील चव्हाण व शेतकरी उपस्थित होते.
त्यानंतर उदगीर जळकोट व देवणी तालुक्याची खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक घेण्यात आली त्यासाठी कृषी महसूल पोलीस अधिकारी प्रतिनिधीक स्वरूपात शेतकरी खत विक्रेते उपस्थित होते .त्यामध्ये बियाणे खत उपलब्धता व त्याचे शेतकऱ्यांना वितरण याबाबत चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment