Tuesday, 12 May 2020

ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांना स्मृतींदिनी अभिवादन

ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी                         यांना स्मृतींदिनी अभिवादन                                                                   
  नंदुरबार -  ( प्रतिनिधी वैभव  करवंदकर )   
       ग्राहक चळवळीचे जनक, महानतपस्वी तथा ग्राहकतीर्थ  कै. बिंदुमाधव जोशी यांच्या पाचव्या  स्मृतिदिनानिमित्त रविवार दिनांक १० मे रोजी नंदुरबार तालुका ग्राहक पंचायतीतर्फे प्रतिमा पूजनाने अभिवादन करण्यात आले. यानिमित्त कोरोना  योद्ध्यांचा  सन्मान करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला .कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या  नियमांचे व सूचनांचे पालन करून प्रत्येकाने घरात रहा सुरक्षित रहा असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले आहे.                          शहरातील बालवीर चौक परिसरातील महादू हिरणवाळे  यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र प्रवासी महासंघ आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्यातर्फे कै. बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून  घरगुती स्वरूपात अभिवादन करण्यात आले. यावेळी शारीरिक अंतर ठेवून मास्क लावून  तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे व सचिव डॉ. गणेश ढोले उपस्थित होते. ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी १९७४ मध्ये ग्राहक पंचायत संघटनेची स्थापना करून भारतीय ग्राहक चळवळीच्या लोकयात्रेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचा नंदुरबारकरांशी जिव्हाळ्याचा ऋणानुबंध होता. वयाच्या पंचाहत्तरीत त्यांना ग्राहकतीर्थ म्हणून उपाधी बहाल करण्यात आली तर वयाच्या ८४ व्या वर्षी म्हणजे १० मे २०१५ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. कोरोना महामारीच्या युद्धात  लढा देणारे योद्धा अर्थात महसूल विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य विभाग, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, नगर परिषद अधिकारी व कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी, टपाल विभागातील पोस्टमन व कर्मचारी, औषध विक्रेते, प्रसारमाध्यमातील पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन या सर्व योद्धांचा नंदुरबार तालुका ग्राहक पंचायततर्फे लवकरच यथोचित सन्मान आणि गौरव करण्याचा मानस ग्राहक पंचायतचे  नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment