नंदगाव ( ता - करवीर ) व परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला . वाऱ्याच्या प्रंचड वेगामुळे मोठ मोठली झाडे रस्त्यावर पडली . पाऊस व वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ऊस पिक उमळून खाली पडून खुप नुकसान झाले आहे . अनेक घरांच्या छताची कौले , व सिंमेटचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे . व पावसाचे पाणी थेट छतावरुन घरात साचले .भात पेरणी केलेल्या शेतांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते . अनेक शेतकरऱ्यांनी साचलेले पाणी काढण्यासाठी लगबगीने शेताची वाट धरली .
पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या मात्र या पावसामुळे साधल्या अशी चर्चा परिसरातील शेतकऱ्यांच्यात होती .
( फोटो . विदया मंदीर नंदगाव जवळील मुख्य रस्त्यावर पडलेले भले मोठे झाड , ( छाया . विजय हंचनाळे. नंदगाव )
No comments:
Post a Comment