Sunday, 31 May 2020

ठाणेदाराच्या तत्परतेने हरवलेले 1 लाख 11 हजार रुपये मिळाले - माहिती देणाऱ्याचा असाही प्रामाणिक पणा

*    *प्रतिनिधि आरिफ़ पोपटे* 
  कारंजा लाड दि. 31  कारंजा येथे रिकरींग व्यवसाय करणारा  कामानिमित्त सुपर मटण दुकान मंगरूळपीर रोड कारंजा या दुकानात गेला असता त्याच्याकडे असलेल्या 1 लाख 11 हजार 500 रुपयांची बॅग त्या दुकानात राहली. मात्र ती बॅग राहल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांना मिळताच त्यांनी विलंब न लावता काही वेळातच त्या दुकानातून 1 लाख 11 हजार 500 रुपये असलेली बॅग ताब्यात घेतली. या बाबत माहिती देणारा व्यक्ती व ठाणेदाराच्या तत्परतेमुळे 1 लाख 11 हजार 500 रुपयांची बॅग ज्याची आहे त्याला मिळाल्याने त्याने समाधान व्यक्त केले.
     सविस्तर असे की दि.31मे रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान मंगरूळपीर रोडवरील सुपर मटण दुकानात रिकरींग करणारा राजू मोतीराम ढोके रा खाटिक पुरा हा दुकानात गेला असता काम झाल्यानंतर तो त्या ठिकाणाहून निघून गेला मात्र त्याच्याकडे असलेली बॅग ही त्याच दुकानात राहल्याची माहिती अरविंद भगत याला होती. त्याने दुकाना बाहेर येताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांना माहिती देताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच सुपर मटण दुकानात पोचले. त्या दुकांदाराकडू शिताफीने बॅग हस्तगत केली. त्या बॅग मध्ये 1 लाख 11 हजार रुपये व रिकरींग चे कागदपत्रे मिळाली. माहिती देणारा अरविंद भगत व ठाणेदार पाटील यांच्या तत्परतेने  राजू ढोके यांना 1 लाख 11 हजार 500 रुपये मिळाल्याने त्यांनी आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment