ओएन जेसी,ज.मँ.व ऐसीजेपीचे राष्ट्रीय खजिनदार यांनी राबविला अतुल्य उपक्रम
मंगरूळपीर / ता प्र (m आरिफ पोपटे ) :-
सद्या देशात कोरोना या जिवघेण्या विषाणुने थैमान माजवले असुन राज्यातील काणाकोपऱ्याती गोर गरिब,मजुर,कामगार,हे मोठमोठ्या शहरात कामा निमित्ताने अडकुण पडलेत,अश्यात मदतीचा हात म्हणुन मुंबई ओएनजीसी चे जागेश सोनकुवर हे पुढे सरसावले असुन वाशीम अकोला बुलढाणा यवतमाळ अमरावती येथील नागरिकांना आर्थिक मदती सह अन्नपुरवठा करून आपले अतुल्य कार्य राबवत आहे*
जागेश सोनकुवर हे आँल इंडिया एस सी / एस टी वेल्फर अँसोशियशन चे जनरल मँनेजर असुन ओएन जेसी सह ए सी जे पी या अंतराष्ट्रीय संघटनेचे खजिनदार आहे, मुंबईत सध्या कोरोना चा वाढता कहर पाहता लाँकडाऊन मध्ये वाढ करण्यात आल्याने कुणालाही स्थलांतरित करणे शक्य नसल्याने विदर्भातील काही जिल्ह्यातील मजुर तेथे अडकुण पडलेत त्यांच्यावर उपासमारीची पाळी वोढावली होती मात्र वाशिम जिल्ह्यातील एसी जेपी चे महाराष्ट्र सचिव विनोद ताटके.अँड,डॉ मोहण गवई. यश कंकाळ रवि सावंत.सुनील वानखडे. दिलीप डोंगरे.नागसेन सुरवाडे.अक्षय ताटके.यांनी भ्रमणध्वनीवर सोनकुवत यांना संपर्क केला व कळविले की वाशिम. अकोला.बुलढाणा. अमरावती. यवतमाळ. येथील .मागासवर्गीय मजुरा सह विमुक्त भटक्या जमातीतील व वडार समाजातील बहुसंख्य मजुर अडकलेत व उपासमार होत आहे ,त्यावेळी जागेश सोनकुवर यांनी कोणताच विलंब न लावता ज्या ज्या ठिकाणी हे मजुर असतील त्या त्या ठिकाणी मुंबईत जावुन त्यांचे जेवनाची व्यवस्था करत रोख आर्थिक मदतीचा हात दिला व अजुन सुद्धा मुंबईत सोनकुवत हे अन्नदान करत आहे.तेथे अडकलेल्या मजुरांनी त्यांचे आभार मानले व वाशिम जिल्हा एसी जेपी चे सुद्धा आभार मानलेत