कोरोना विषाणू आणि संभाव्य महापूर या दोन्ही संकटांना शिरोळ तालुक्याला सामोरे जावे लागणार असून यासाठी गाव स्तरावरती योग्य नियोजन करावे लागणार असल्याचे मत राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सैनिक टाकळी येथे केले ते येथील ग्रामस्थांच्या समवेत कोरोना महामारी व पूर परिस्थिती च्या आढावा बैठकीत बोलत होते. ते म्हणाले गतवर्षीच्या अनुभवातून रेस्क्यू ऑपरेशन ची पूर्वतयारी केली आहे. शिरोळ तालुक्यासाठी एनडीआरएफ ची टीम तत्पर असेल . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य महापूर नागरिकासाठी कसोटीचा असणार आहे यासाठी सरकारी यंत्रणा व नागरिकांच्या सहकार्यातून यावरती मात करावी लागेल. यावेळी नागरिकांंनी गत वर्षीच्या महापुरा मध्ये आलेल्या अडचणी विषयी आपली मते मांडली . पूर बाधित कर्जमाफीचा विषय दोन तीन दिवसातच निकालात निघेल असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी सरपंच हर्षदा पाटील उपसरपंच सुदर्शन भोसले पोलीस पाटील सुनिता पाटील यांचेसह ग्रामसेवक तलाठी ग्रामपंचायत सदस्य आरोग्य विभागाचे कर्मचारी कृषी सहाय्यक बेरड माजी पं स. उपसभापती हरिश्चंद्र पाटील, माजी उपसरपंच रणजितसिंह पाटील, अरूण पाटील,महावीर शिरहट्टी , यांचेसह गावातील कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment