खेबवडे ( ता - करवीर ) येथील श्री. शशीकांत मारूती कांबळे हे नंदगावमधून खेबवडे गावाकडे जात असताना नंदगाव येथे रेणूका मंदीर परिसराजवळून गाडीवरून जात असताना त्यांचे पैशाचे पाकीट रस्त्यावर पडले . घरी गेल्या वर त्यांच्या लक्षात आले की महत्वाची कागदपत्रे व पैसे ठेवले असलेले पाकीट कुठेतरी हरवले आहे . ते या घटनेमुळे खुप अस्वस्थ झाले .व परत मागे येवून शोधा शोध केली व रिकाम्या हाताने घरी परतले . पण घरी चिंतेत बसले असताना त्यांना फोन आला . की तुमचे पैशाचे पाकीट आम्हांला सापडले आहे . आणी ते येवून घेवून जा . तुमच्या डायरीतील नंबरावरून आम्ही फोन केला आहे असा त्यांना फोन आला ,ते तात्काळ नंदगाव येथे आले नंदगावमधील आण्णा सांगावे , व अनिल भांडवले यांना रेणूका मंदिराकडे जात असताना ते पाकीट सापडले होते . त्यामध्ये कांबळे यांची महत्वाची कागदपत्रे व पैसे होते . प्रामाणिक पणे सांगावे , व भांडवले या दोघांनी ते पाकीट परत केले . शशीकांत कांबळे यांनी पाकीट मधील रक्कम बक्षीस रुपी देवू केली पण त्यांनी हे बक्षीस रक्कम घेतली नाही त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतूक नंदगाव व परिसरातील ग्रामस्थांच्याकडून होत आहे .
No comments:
Post a Comment