निगवे खालसा ग्रामपंचायती तर्फे परप्रांतियांना धान्याचे वाटप
निगवे खालसा : प्रतिनिधी :- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १३ दिवस झाले लॉक डाऊन सुरू झाले आहे सर्व कामे बंद आहेत, मजुरीची कामे बंद आहेत. मजुरी नसल्याने पर प्रांतीय मजुरांचे हाल होत आहे मजुरांचे हाळ होऊ नये म्हणून त्यांना निगवे खालसा ग्रामपंचायतीच्या मार्फत मोफत धान्य देण्यात आले. यावेळी त्यांना एक महिना पुरेल एवढे धान्य पाच कुटुंबांना देण्यात आले. यामध्ये कर्नाटकची ४ कुटुंबे राजस्थानचे १ अशी एकूण ५ पर प्रांतीय कुटुंबे आहेत.
यावेळी ग्रामविकास अधिकारी एस वाय कांबळे, तलाठी महेश पाटील, क्लार्क जयवंत पाटील, कोतवाल गोरक्ष गुरव, मॅनेजर संभाजी कुंभार, दिलीप गोंगाने, धनाजी पाटील आदी उपस्थित होते
No comments:
Post a Comment