Saturday, 2 May 2020

राजेंद्रनगर येथील स्टार आशियाना सोसायटीकडून धान्य वाटप ..

राजेंद्रनगर येथील स्टार आशियाना सोसायटीकडून धान्य वाटप ..
कंदलगाव - प्रतिनिधी
      कोरोना संचारबंदी काळात अनेक मजूरांचे व कामगारवर्गाचे अन्नधान्या पासून परवड होत आहे . आशा वेळी आपल्याकडे असणाऱ्या साठ्यातील थोडासा वाटा बाजूला काढून गरजूंना देण्यासाठी समाजातून पुढाकार वाढत आहे .
      राजेंद्रनगर येथील स्टार आशियाना एचआर .४ मधील अमर बुचडे , निलेश चव्हाण , राजू दुग्गेवाडी , सुरेश खोत , एम.एस. पाटील व स्टार आशियानामधिल रहिवाशांनी वीस कुठूंबाना १५ दिवस पुरेल इतके धान्य वाटप करण्यात आहे . यामध्ये दैनंदिन लागणारे सर्व साहित्य होते .

No comments:

Post a Comment