Saturday, 2 May 2020

शिक्षकाने जोपासली सामाजिक बांधिलकी . सुहास सुतार यांचा अभिनव उपक्रम ....

शिक्षकाने जोपासली सामाजिक बांधिलकी . सुहास सुतार यांचा अभिनव उपक्रम ....
कंदलगाव - प्रकाश पाटील 
      शिक्षक म्हटले कि विद्यार्थी व पालकांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो . हातात छडी , तानलेले डोळे , रागीट चेहरा , मोठा आवाज अशीच शिक्षकांची प्रतिमा आपल्या समोर उभी असते . पण ज्ञानदिप विद्या मंदिर , राजेंद्रनगर येथील शिक्षक सुहास सुतार यांनी आपल्या हातातील छडीऐवजी पेनाची कमाल समाजापुढे सादर करून मुलांबरोबर परिसरातील नागरीकांचेही समाजप्रबोधन केले आहे . 
   
फोटो - शिक्षकी पेशा संभाळत लेखन ,जनजागृतीत मग्न असताना शिक्षक सुहास सुतार .

  सुतार यांनी आपल्या चित्रकला व लेखनीतून अनेक घोषवाक्य तयार करून ती सोशल मेडियातून प्रसिद्ध केली आहेत . चा मध्ये स्लोगनमधून जनजागृती , महापुरातील वस्तूस्थितीचे दर्शन , पक्षी वाचवा , सुविचारातून मतपरिवर्तन , चित्र रेखाटन असा छंद जोपासत अनेक विद्यार्थ्यांना अक्षर सुधारणेसाठी मोफत मार्गदर्शन करतात . 
     सुहास सुतार यांचा जन्म भुदरगड तालुक्यातील हेदवडे गावी झाला असून त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील मराठी शाळेत झाले .डोंगराळ परिसरातून आलेल्या या शिक्षकाने आपल्या कलागुणाचा वापर इतरांसाठी केल्याने आशा शिक्षकाचा कोणाला हेवा वाटू नये ....
     सुट्टी सुद्धा आपली कला जोपासत लेखनाबरोबर , पक्षांसाठी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर करून त्यांना पाण्याची सोय केली आहे . या कामासाठी त्यांचे आई - वडिल , भाऊ तसेच सुविद्य पत्नीचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगीतले .

No comments:

Post a Comment