Wednesday, 6 May 2020

शिरोळ तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधीशी साधणार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद .


शिरोळ तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधीशी  साधणार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद .
सैनिक टाकळी प्रतिनिधी 
 खासदार धैर्यशील माने गुरुवार दि. ७ मे रोजी सकाळी ११ वाजता शिरोळ तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी , लोकप्रतिनिधी  संवाद साधारण आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना व कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील विकासकामांना खीळ बसू नये, यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत गुरूवार दि ७ मे  रोजी  मतदार संघातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनीधी यांच्याशी खासदार धैर्यशील माने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघातील  प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा व लोकप्रतिनीधी यांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याचा आढावा खासदार माने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेत आहेत.  तालुक्याचे तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याशी सकाळी आकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काय उपाययोजना केल्या आहेत, लॉकडाऊनच्या काळात कोण-कोणती कामे करण्यास प्राधान्य देता येईल, आरोग्य यंत्रणा व आरोग्य विषयक सूचना, ग्रामीण विकासाबाबत धोरणात्मक व नियोजनबद्ध काम करण्याबाबतच्या महत्वपूर्ण सूचना, शेती व उद्योग, रेशन धान्य वितरण आदी विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये चर्चा होणार आहे. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सर्वं लोकप्रतिनिधीना स्वतःच्या घरातूनच सहभागी होता येणार असून, त्याबाबतचे मार्गदर्शक सूचना प्रशासनातर्फे देण्यात येणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment