गडमुडशिंगीतील राष्ट्रसेवकांचा सत्कार
गांधीनगर प्रतिनिधी,
एस एम वाघमोडे
गडमुडशिंगी (ता. करवीर ) येथील बंटी पाटील प्रेमी ग्रुप तर्फे कोरोना पार्श्वभूमीवर स्वतःच्या जीवाची परवा न करता राष्ट्र सेवा करणाऱ्या कोरणा विरुद्धच्या लढाईतील सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य अधिकारी व सर्व स्टाफ,
गांधीनगर पोलीस स्टेशन सर्व स्टाफ , अंगणवाडी सेविका व आशा सेविका, पत्रकार बंधू , ग्रामपंचायत कर्मचारी , ग्रामसेवक, सर्कल, तलाठी, कोतवाल, विद्युतचे सर्व कर्मचारी,गॅस पुरवठा करणारे सर्व स्टाफ , गावात पाणी पुरवठा करणारे टँकर मालक या सर्वांचे सामाजीक बांधिलकी म्हणून जाहीर सत्कार करण्यात आला.
प्रसंगी गावातील जेष्ठ नेते, मा सिनेट मेम्बर मा श्री डॉ अशोक पाटील, मा श्री प्रदीप झांबरे मा सभापती पंचायत समिती सदस्य, मा श्री रावसाहेब पाटील आ बंटी पाटील गटनेते, मा श्री बाबासाहेब माळी मा जि प सदस्य, मा श्री अप्पासाहेब धनवडे ग्राम प सदस्य, मा श्री विनोद सोनूले, मा श्री राहुल सूर्यवंशी, मा श्री दिलीप थोरात, सौ माधुरी कांबळे, ग्राम पंचायत सदस्य, श्री संतोष कांबळे युवा कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, सचिन पाटील, तानाजी धनवडे, सुभाष सोनूले, सुकुमार देशमुख, बागल कामत, जितेंद्र कांबळे, बाळासो कांबळे, विश्वास मानदेशी, मयूर सोनूले आदी उपस्थित होते.
या सत्कारच्या कार्यक्रमाबद्दल गावकर्यांनी व सत्कारमूर्तींनी कृतज्ञता व्यक्त केली.
No comments:
Post a Comment