Wednesday, 6 May 2020

पेठ वडगांवात सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी - संभाव्य धोका ओळखून वडगांवातील वाईन शॉप बंद

पेठ वडगांवात सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी - संभाव्य धोका ओळखून वडगांवातील वाईन शॉप बंद
   पेठ वडगांव / वार्ताहर - कोरोना रोगाचा संभाव्य धोका ओळखून वडगांव नगरपालिकेने विजय वाईन शॉप बंद केले आहे.
         शासनाच्या आदेशानुसार वाईन शॉप सुरू करण्यात आले होते,परंतु वडगांव शहरात एकमेव असणा-या विजय वाईन शॉपी मध्ये मद्य खरेदी करण्यास दोन दिवस प्रचंड गर्दी झाली होती.यावेळी सोशल डिस्टसींग पाळले जात नव्हते.त्यामुळे कोरोना विषाणू फैलाव होण्याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी वडगांव नगरपालिकेने हे वाईन शॉप आजपासून बंद केले आहे.पालिकेच्या या निर्णयामुळे तळीरामांच्या आनंदावर वीरजन पडले आहे तर पालिकेच्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
       दरम्यान  लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून     लॉकडाऊनला शिथिलता देणेत आली आहे परंतु याचा लोक गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.बाजारात प्रचंड गर्दी होत आहे.प्रत्येकवेळी पालिकेला हस्तक्षेप करावा लागतो.नागरिकांनी स्वताला स्वयंशिस्त लावून घेतली पाहिजे असे नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment