Wednesday, 6 May 2020

उंचगाव येथील भीषण अपघातात युवकाच्या दुर्दैवी अंत

उंचगाव येथील भीषण अपघातात युवकाच्या दुर्दैवी अंत
गांधीनगर : प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
ता.६ 
उंचगाव (ता. करवीर )येथील घाडगे पाटील इंडस्ट्रीज समोर मंगळवार (ता. ५) रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास टाटा ७०९ ट्रक व मारुती स्विफ्टकार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला . तर अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ड्रायव्हर फरार झाला असून गांधीनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गांधीनगर पोलीस ठाण्यातुन अपघातविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की,टाटा ७०९ ट्रक (न एम एच ०८-डब्ल्यू ८२९२) (चालकाचे नाव व पत्ता समजू शकलेला नाही)
हा टेबलाई रोड कडून उचगाव कडे तांबडी माती भरून भरधाव वेगाने येत होता.उंचगाव येथील घाडगे पाटील इंडस्ट्रीज समोर ट्रक चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने भरधाव आलेल्या ट्रक ने समोरून येत असलेल्या मारुती शिफ्ट कार (न.एमएच -०९ एफ जे -५००९ )या गाडीला जोराची धडक दिली.या चार चाकी  गाडीचा चालक शुभम शशिकांत भोसले (वय-२६) रा.ग्रामपंचायत कार्यालय समोर सरनोबतवाडी ता करवीर यांच्या उजव्या हातास,डाव्या पायास व डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला .अपघात झाल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेल्याने त्याचा शोध गांधीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. शिंदे हे अधिक तपास करत आहेत. या अपघातबाबतची फिर्याद प्रेम रामदास भोसले (वय-२९) रा मनीषा कॉलनी सरनोबतवाडी यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.

No comments:

Post a Comment