जाती धर्मापलिकडचा प्रामाणिकपणा
...
सैनिक टाकळी
प्रतिनिधी
सध्या लॉकडाऊन सुरू आहे. काम बंद करुन अनेक लोक घरात बसले आहेत. आहे त्या शिल्लक अन्नधान्यावर गुजरान करण्याची वेळ आली आहे. अशा अवस्थेत दररोज कामाला जाऊन पोट भरणाऱ्या गरीब लोकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशाच अडचणीत सापडलेल्या गवंडी कामगाराला सैनिक टाकळीमधून आधार मिळाला. दोन दिवसापुर्वी हरवलेले पैशाचे पाकिट परत मिळाले.
सैनिक टाकळी परिसरामध्ये दैनिक पुढारीसाठी पत्रकार म्हणून काम करणाऱ्या हणमंत पाटील यांना आपल्या दुकानासमोर पाकिट सापडले. त्यामध्ये दोन हजार पाचशे रुपये होते.ते अकिवाट येथील सिरपू गवंडी यांचे होते. दोन दिवसानंतर गवंडी परत आले तेव्हा हणमंत पाटील यांनी त्यांना बोलवून पाकिट दिले. पैसे परत मिळाल्याने गवंडी यांनी गहीवरून आभार व्यक्त केले.
जाती धर्माच्या पलिकडे जाऊन गरीबाच्या कष्टाची जाणिव ठेवत सैनिक टाकळीमध्ये पाहायला मिळालेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
No comments:
Post a Comment