८ मे जागतिक थँलेसेमिया दिन विशेष .
थँलेसेमिया निर्मूलन असोसिएशन कोल्हापूर व रक्तदाता कोल्हापूर .गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरातील तरूणांनी एकञ येत कोल्हापूर रक्तदाता हा ग्रुप चालू करून त्या द्वारे कित्येक गरीब व गरजू रुग्णांना रक्ताची मदत केली . हे काम म्हणावं तेवढं सोपं नक्कीच नव्हतं संघर्षमय प्रवास करत हा ग्रुप आता मोठ्ठा झाला आहे .
कित्येक संकटावर मात करून फौजी रोहीत कदम यांच्या नेतृत्वाखाली रक्तदाता कोल्हापूर ही सेना ३ वर्षापुर्वी एका टप्प्यावर येवून पोहचली तिथे असे दिसले कित्येक असे रुग्ण कि ज्यांना १५ ते २०दिवसांनी रक्त नाही चढवलं तर मृत्यू दारात उभा असतो .कधीही न पाहीलेलं महाभयंकर आजाराचं स्वरूप जीवघेणं आहे त्याला थॅलेसेमिया असं म्हणतात .
आता त्याचा अभ्यास चालू झाला तसेच त्याच्या निर्मुलनाचा आमचा पुढला प्रवास त्यालाही आता २ वर्षे पुर्ण होत आहेत . राजकुमार राठोड , जयराम नाईक , रोहीत गुट्टे , थॅलेसेमिया निर्मुलन असो . कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष रोहीत कदम , संस्थेचे अध्यक्ष अनिल व्हटकर, उपाध्यक्ष रणजित जाधव, सचिव अमोल निल्ले , खजानिस सौ रिना तुरे ,ऐश्वर्या मुनींश्वर,राहुल गोंदिल , अभिजित बुधले, गोपाळ कुंभार,यासर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि टिमच्या धडपडीमुळे थॅलेसेमिया निर्मुलन असोसिएशन मोलाचं काम करत आहे या कामाला जोड आहे ती कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स संघटना व या संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा सौ. नेत्रदीपा पाटील व त्यांचे पदाधीकारी तसेच कोल्हापूरातील समस्त रक्तदाता बंधू भगिनींची .थॅलेसेमिया निर्मुलनाचे हे कार्य आत्ताच्या कोवीड १९ च्या परिस्थितीतीही नियोजनबद्द आणि शिस्तबद्दपणे चालू आहे , असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी २२ मार्च पासूनच सर्व थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांना संपर्क करून त्यांना रक्त घेण्यासाठी येणारी अडचण येवू नये या साठी प्रयत्न करत आहे . तसेच संबंधीत आजारास लागणारी औषधे व लागलेच तर रक्ताची व्यवस्था पण केली जाते . या कामी सि पी आर व इतर काही खाजगी ब्लड बँकाही मदत करत आहेत.
याची गरज तसेच व्याप्ति समजून घेण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला आणि परिवाराला या आजरापासून कसे वाचवावे यासाठी संस्थेचे प्रबोधन कार्यक्रम चालू असतात .
No comments:
Post a Comment