Thursday, 7 May 2020

महाराष्ट्र शासनाने नोकरभरती न करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा-श्रीकांत जाधव



उदगीर प्रतिनिधी *गणेश मुंडे* 
:-आज देशात कोरोना या महामारीचे संकट येऊन कोसळले आहे यात सर्व घटकांचे कमीजास्त प्रमाणात नुकसान झाले आहे या सर्व घटकांनी या नुकसानाला आता मान्य करून आपली पुढील भूमिका बजावत आहेत पण आज अनेक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकांच देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दिवसेंदिवस त्यांचं वय वाढत चाललं आहे आणि यातच महाराष्ट्र शासनाने यापुढील काही वर्षे नोकरभरती न करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांसाठी जीवघेणा ठरेल का काय अस वाटत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक युवकांची नोकरीला लागण्याची वयोमर्यादा संपत आली आहे अश्या युवकांसाठी तर हा निर्णय खूपच दुर्दैवी आहे त्याला कारण ही तसेच आहे  आजपर्यंत आपलं सर्व वय शिक्षणात घातल्यामुळे त्याला शेतातील  काम जमणार नाही आणि तो दुसरे काम करायला देखील जाणार नाही त्यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरण होईल.या निर्णयाचा सर्वात मोठा फटका नव्या नोकरभरतीला बसणार आहे. कारण देवेंद्र फडणवीसांच्या काळात रखडलेली 72 हजार जागांची भरती करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र कोरोना संकटामुळे ही भरती रखडली आहे. कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेश अर्थविभागाने दिले आहेत.त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा असे मत विद्यार्थी नेते तथा मराठवाडा अससोसिएशन फॉर स्टुडंट(मास) चे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी प्रसारमाध्यमांना बोलतेवेळी व्यक्त केले..

No comments:

Post a Comment