Thursday, 7 May 2020

यवतमाळ जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण कारंजातील नामांकित डॉक्टर व सात वैद्यकीय व्यावसायिकांच्या संपर्कात

यवतमाळ जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण कारंजातील  नामांकित डॉक्टर व सात वैद्यकीय व्यावसायिकांच्या संपर्कात
       तपासणी करिता वाशिम ला रवाना
               उद्या होणार तपासणी 
कारंजा लाड (m आरिफ पोपटे )दि. 7 कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल व आरोग्य, पोलीस यंत्रणा सतर्कतेने काम करीत असतांना ग्रामीण पोलिसांच्या चेक पोस्ट वरून कारंजात आलेला यवतमाळ जिल्ह्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला. तो  उपचारासाठी कारंजातील नामांकित डॉक्टर व लॅब व सोनोग्राफी करणाऱ्याच्या संपर्कात  4 मे रोजी आल्याने डॉक्टर सह 7 आरोग्य सेवेत खाजगी सेवा देणाऱ्या 7 जणांना वाशिम येथे तपासणीसाठी पाठवल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. मात्र यांच्या रीपोर्टच्या अहवालाकडे जिल्हा वासीयांचे लक्ष लागले आहे.
        यवतमाळ जिल्ह्यातील नेरचा तो रुग्ण नियमित तपासणी करिता कारंजातील नामांकित एम डी डॉक्टर  कांत कडे दि.4 मे रोजी आला असता तो रुग्णालयात 1 तास थांबला असून त्यांची रक्त तपासणी व सोनोग्राफी केल्यामुळे तो जवळपास 8 जणांच्या  संपर्कात आला. त्यावेळी त्यांचा रक्त तपासणी अहवाल व  एक्स-रे च्या रिपोर्ट वरून डॉ अजय कांत यांच्या दीर्घ अनुभवावरून त्या रुग्णाचे लक्षण लक्षात येताच  त्याला कारंजा येथे भरती न करता थेट यवतमाळ येथे पाठवले.  तो प्रथम खाजगी रुग्णालयात गेला. त्या खाजगी डॉक्टर चा फोन कारंजातील डॉक्टर यांना आल्यानंतर त्यांनी त्या डॉक्टर ला भरती करून घेऊ नका त्याला थेट सरकारी रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिल्यामुळे तेथील ही अनर्थ टळला आणि तो पेशंट  तो 4 मे रोजी यवतमाळ येथील सरकारी रुग्णालयात भरती झाला. कोरोना संसर्गाचा तपासणी रिपोर्ट 6 मे रोजी पॉझिटिव्ह आल्यामुळे कारंजातील संपर्कात आलेल्या डॉक्टर व पत्नी व दोन सहकारी व लॅब चे संचालक व 1 सहकारी, 1 सोनोग्राफी असे एकूण 8 आरोग्य सेवेतील नागरिकांच्या तपासणी करिता दि.7 मे रोजी सर्वांना सकाळी वाशिम येथे पाठवण्यात आले. त्या 8 जणांची तपासणी 8 मे रोजी होणार आहे कारंजा वरून गेलेले 8 जणांनी आम्ही वाशिम येथेच 
कोरोन्टाईन राहतो तेव्हा त्यांना लेडीज हॉस्टेल वर कोरोटाईन  केले 8 तारखेला होणाऱ्या तपासणी वरून कसा अहवाल प्राप्त होतो  याकडे कारंजा वासीयांचे  लक्ष लागले आहे.
      यवतमाळ जिल्ह्यातील आलेला रुग्ण कारंजा शहरात नातेवाईक जरी असले तरी तो कोणालाच भेटला नसल्याचा दुजोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांनी दिला.

माझा तो नियमित रुग्ण असल्याने तपासणी करिता आला. त्यावेळी त्याची लक्षणे लक्षात घेता, त्याला आपण भरती न ठेवता त्वरित सरकारी रुग्णालय यवतमाळ जिल्ह्यात भरती होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याचा 6 मे रोजी कोरोना संसर्ग असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे आमच्या संपर्कातील आम्ही सर्व स्वतःहून कोरोन टाईन होऊन रुग्णालय 14 दिवस बंद राहणार आहे डॉ या नात्याने पेशंट ला तपासणे हे आमचे कर्तव्य  आहे पण  त्याचे आलेले अहवाल  पाहिल्याबरोबर  लगेच लक्षात आले  आणि  त्याला  यवतमाळ येथे जाण्यास  सांगून  लगेच  पेशंटला  रवाना केले  डॉक्टर कानडे यांच्या सतर्कतेमुळे आणि  त्यांच्या अनुभवामुळे  कारंजा तालुक्यात  संक्रमण  होण्यापासून वाचविले  ही महत्त्वाची बाब आहे नागरिकांनी घरात राहून आपली काळजी घ्यावी काही गरज असल्यास मोबाईलवर संपर्क साधावा
डॉ अजय कांत एम डी कारंजा

No comments:

Post a Comment