Wednesday, 6 May 2020

विद्यार्थ्यांनशिवाय शिक्षकांना वेळ जाईना ..शिक्षिका सौ . सुजाता सुर्यवंशी यांचा कोरोना सुट्टीचा अनुभव ....

विद्यार्थ्यांनशिवाय शिक्षकांना वेळ जाईना ..
शिक्षिका सौ . सुजाता सुर्यवंशी यांचा कोरोना सुट्टीचा अनुभव ....
प्रतिनिधी - प्रकाश पाटील ,
        एखाद्याची ओढ लागणे हे त्या गोष्ठीत मन रमल्याचे उदाहरण आहे . मग ती मंदिरातील पुजा असो वा शाळेतील सहवास ...
       अशीच काही ओड राजेंद्रनगर येथील ज्ञानदिप विद्या मंदिरातील शिक्षिका सौ . सुजाता अनिल सुर्यवंशी यांना लागली आहे . सुमारे वीस वर्षाच्या या शिक्षकी नोकरीमध्ये त्यांना घरच्यांपेक्षा शाळेतील मुलांची जास्त ओड असल्याने अनेक सुटलीतील वेळ त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमात घालविले आहेत . 
       सध्या कोरोनाचे दिवस असून प्रशासनाने या विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी सर्वच शाळा बंद ठेवल्याने गेल्या दोन महिण्यापासून विद्यार्थी , शिक्षकांचा संपर्क नाही . आशा वेळी  विद्यार्थ्यांना सुट्टीतील आपला उपक्रम भेट देण्यासाठी त्यांनी या सुट्टीत विविध उपक्रम अंगीकृत करून घेतले आहेत .
       वाचन , लिखान या बरोबर गोष्टींचा खजीना आपल्या सोबत घेऊन या सुट्टीनंतर तो सर्व खजीना आपल्या विद्यार्थ्यांना भेट देणार आहेत .आपल्या सुट्टीतील एक दिवसही वाया न घालविता विविध पदार्थ बनवून उरलेला वेळ कादंबरी व पुस्तक वाचण्यात घालविला आहे . 
      शिक्षक असल्याने आपल्या सुट्टीतील सर्व वेळ आपल्या कुठूंबाला त्यांना देता आला असता . मात्र माझे विद्यार्थीच माझे कुठूंब आहे असे बोलून त्यांनी आपल्या ज्ञानाचा खजीना विद्यार्थ्यानसाठी वाढविला आहे ..
     मराठी शाळेचा मान वाढविण्यासाठी असे शिक्षक व लळा लावणारे विद्यार्थी सर्वांनाच मिळावेत अशी त्यांची भावना आहे .

No comments:

Post a Comment