Tuesday, 12 May 2020

शेतकऱ्यांना बांधावर रासायनिक खते वाटप......

पट्टणकोडोली : -(साईनाथ आवटे)

 शेतकऱ्यांना बांधावर रासायनिक खते वाटप...... 
खरीप हंगामात शेतक-यांना रासायनिक खतांचा तुटवडा भासु नये तसेच रासायनिक खते वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, उपविभागीय कृषि अधिकारी मकरंद कुलकर्णी यांचेे मार्गदर्शन खाली   तालुका कृषी अधिकारी हातकणंगले जी. एस. गोरे व पैसाफंड शेतकरी सहकारी बँक हुपरी यांचे खत विभागामार्फत हुपरी व हुपरी परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर रासायनिक खते वाटप करण्यात आली. यावेळी हुपरी येथील शाहु गायकवाड यांच्या अंबाई शेतकरी गटाला रासायनिक खतांची योग्य किंमत घेऊन खते वाटप करण्यात आली यावेळी मंडळ कृषी अधिकारी सर्व कर्मचारी व कृषी सहाय्यक के.डी. हळदे, कृषि पर्यवेक्षक के. आर.तोडकर,आर.एस.पाटील तसेच पैसाफंड बँकेचे शेती अधिकारी येळवडे, नाथाजी पाटील, सोमनाथ हळदे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment