रिलायबल शुगर्स , फराळे कडून शेतकऱ्यांची ऊस बिले थकित.
१६ जानेवारी पासुन बिले थकित; शेतकरी आर्थिक संकटात.
निगवे खा. : डी.एस.ढगे.
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर दीड महिन्याच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्या हातबल झाला आहे. शेतकऱ्याला आधार फक्त ऊसबिलाचा असतो. पण गेले चार महिने झाले रिलायबल शुगर्स ( फराळे ) ने शेतकऱ्याची ऊसबिले थकिवल्यामुळे निगवे खालसा परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. कारखाना सुरु झाल्यापासून १५ जानेवारी अखेर पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याकडे पाठवला त्यांची ऊस बिले जमा झालीत. पण त्यानंतर १६ जानेवारी नंतर ऊस पाठवलेल्या शेतकऱ्यांची बिले चार महिन्यापासुन थकित आहेत. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला सोसायटी वेळेत भागवण्यासाठी पैशाची गरज आहे. तसेच सध्या ऊसाच्या भरणीसाठी शेतकऱ्याला खते, औषधे, किटकनाशके घेण्यासाठी, शेतकऱ्याला पैशाची अत्यत गरज आहे.पण रिलायबल शुगर्स ने ऊसबिल थकित ठेवल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.
ऊस नियंत्रण कायदा १९६६ कलम(३) नुसार शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला गेल्यापासून १४ दिवसाच्या आत ऊस बिल देणे कारखान्याला बंधनकारक आहे. पण १४ दिवसाच्या आत ऊस बिल न दिल्यास १५% व्याजासह शेतकऱ्यांची सदरची थकित रक्कम दयावी लागते. तसेच रक्कम न दिल्यास आरआरसी अंतर्गत जप्तीची कारवाई साखर सहसंचालक कारखान्यावर करू शकतात,हे माहित असून देखील रिलायबल शुगर्स फराळे कडून शेतकऱ्याची चार महिने पासुन ऊसबिले थकित ठेवली आहेत.
शेतकऱ्याला घर खर्चासाठी, वैदयकिय कामासाठी, छोटया -मोठया कार्यासाठी, वास्तू बांधण्यासाठी ऊस बिलावरच अवलंबुन रहावे लागते.पण रिलायबल कडून ऊसबिल मिळेल या आशेने बॅकेच्या दारात हेलपाटे मारून शेतकरी थकला आहे. तरी रिलायबल शुगर्स कडून लवकरात लवकर ऊस बिल जमा करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
No comments:
Post a Comment